Ladka Bhau Yojana : नमस्कार मित्रांनो , महाराष्ट्र सरकार हे नवीन नवीन योजना राबवत आहे . यामध्ये “लाडका भाऊ योजना” काय आहे ? याचा लाभ कुणाला मिळणार याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.
महाराष्ट्र सरकारने महिला यांच्या साठी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना” सुरू केली आहे. तर लाडक्या भावांसाठी सुद्धा योजना सुरू केली आहे . या योजनेला “मुख्यमंत्री-माझा लाडका भाऊ” असे नाव देण्यात आले आहे.
लाडका भाऊ योजना
“मुख्यमंत्री-माझा लाडका भाऊ” योजना ही नवीन योजना नसून त्याचे नामकरण आधी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” असे होते. ही जुनी योजना मुख्यमंत्री यांनी नव्याने चांगल्या प्रकारे सुरू केली आहे. व या योजनेला युवा सुद्धा खूप प्रतिसाद हे देत आहेत.
योजनेचे नाव | लाडका भाऊ योजना |
राज्य | महाराष्ट्र |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
लाभ | शैक्षणिक पात्रतेनुसार |
कालावधी | 6 महीने |
महाराष्ट्र सरकारने 9 जुलै 2024 रोजी शासन निर्णय काढून “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजनेस म्हणजे लाडका भाऊ योजना यास मान्यता ही देण्यात आलेली आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही शासन निर्णय हा वाचू शकता.
लाडका भाऊ योजना सुरू करण्याचा हेतू
लाडका भाऊ योजना सुरू करण्याचा खालील प्रमाणे सरकारचे उद्देश हे आहेत.
- राज्यातील युवकांना नोकरी पूर्व प्रशिक्षण देणे.
- नोकरी पूर्व प्रशिक्षण दिल्याने त्यांना चांगल्या ठिकाणी जॉब मिळू शकतो.
- युवकांना मदत करणे
- युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
वरील प्रमाणे महाराष्ट्र सरकारचे लाडका भाऊ योजना सुरू करण्यामागचे उद्देश आहेत.
Ladka Bhau Yojana Documents List
लाडका भाऊ योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्र व पात्रता ही पूर्ण करावी लागणार आहे.
- अर्जदार यांचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असावे.
- अर्जदार यांची शैक्षणिक पात्रता बारावी पास किंवा आयटीआय किंवा पदवीधर किंवा पदविका किंवा पदव्युत्तर असावी.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- आधार कार्ड असणे आवश्यक
- मोबाईल क्रमांक
- बँक खाते
वरील माहिती व कागदपत्रे तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे.
Ladka Bhau Yojana Benefits
लाडका भाऊ योजनेचे खालील प्रमाणे तुम्हाला फायदे हे मिळणार आहेत.
शैक्षणिक पात्रता | लाभ |
---|---|
बारावी पास | रु. 6000 |
आयटीया/पदविका | रु. 8000 |
पदवीधर/पदवीधर | रु. 10000 |
तर वरील प्रमाणे लाडका भाऊ योजनेला लाभ हे मिळणार आहेत. तर इच्छुक उमेदवार यांनी लवकरात लवकर अर्ज हे करायचे आहेत.